Ladki Bahin Yojana Nanded : लाडकी बहीण संवाद कार्यक्रमात गोंधळ, साडी वाटप कार्यक्रमात महिलांची झुंबड
Ladki Bahin Yojana Nanded : लाडकी बहीण संवाद कार्यक्रमात गोंधळ, साडी वाटप कार्यक्रमात महिलांची झुंबड
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रयवादाची चढाओढ लागलीय.लाडकी बहीण योजनेचे श्रयवाद घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष लढत आहेत.आज नांदेडच्या तामसा येथे लाडकी बहीण योजना "लाडक्या बहिणींचा देवा भाऊ" या उपक्रमा अंतर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन हजार साड्या वाटप करण्याचे आयोजकांनी सांगितले होते. परंतु महिलांची संख्या जास्त झाली. साड्या कमी पडल्या आणि याठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली.साड्या वाटपा पूर्वीच हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला.अनेक महिला साड्या न घेताच वापस निघून गेल्या.सकाळपासून साड्या घेण्यासाठी ह्या महिला तामसा येथे हजर झाल्या होत्या.परंतु साड्या न मिळाल्याने हिरमोड झाला.