Kundmala Bridge Collapsed: अडीच तास पाण्यात होतो,पूल कोसळल्यावर वैभवबरोबर काय घडलं?
पुणे: पुण्यातील कुंडमळा येथे (Indrayani Kundmala bridge collapse) झालेल्या दुर्घटनेत 51 जखमी झाले आणि त्यांच्यावर तळेगाव मधील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्यातीलच अथर्व रुग्णालयात काही जणांवर उपचार सुरू आहेत. कुंडमळ्याच्या (Indrayani Kundmala bridge collapse) ठिकाणी पूल धोकादायक असल्याची कोणतीही पाटी आम्हाला दिसली नाही ती जर पाटी मोठी असती तर आम्हाला दिसली असती. सोबतच पुलावर एकाच वेळी दोन्ही कडून दोन गाड्या आल्यात आणि त्यामुळे अख्खा फूल जाम झाला. पुलावर लोड आला आणि त्यामुळे पूल कोसळला, अशा भावना जखमी पर्यटकांनी व्यक्त केली आहे. सोबतच दिल्लीहून आलेल्या एका पर्यटकांनी देखील पुलावर लोड आल्याने हा पूल कोसळल्याचा बोलून दाखवले आणि या दुर्घटनेला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. पर्यटकांनी धोका असलेली पाटी वाचली नाही, असंही जखमींच म्हणणं आहे.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?
- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन् ते रविवारी कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?





















