Parambir Singh in Mumbai : परमबीर सिंह मुंबईत दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!
Parambir Singh at Mumbai : परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच काही वेळापूर्वी परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह अचानक परतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली होती. कोर्टानं आदेश दिल्यास चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही परमबीर सिंहांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आपण तपासाला सहकार्य करु आणि आपल्याला जे सांगायचंय ते आपण कोर्टात सांगू असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















