एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi 2025 : नाशिकचे उगले कुटुंबीय ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत केली विठूरायाची शासकीय महापूजा
Ashadhi Ekadashi 2025 : नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या उगले कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपुरात शासकीय महापुजेचा मान मिळाला. त्यामुळे उगले कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
Ashadhi Ekadashi 2025
1/10

आषाढी एकादशी निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावचे शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाला.
2/10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली.
3/10

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.
4/10

विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्य यांनी रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
5/10

त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
6/10

मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
7/10

यासोबतच उगले दाम्पत्याला एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.
8/10

कैलास उगले हे गेल्या 12 ते 15 वर्षांपासून नियमित पंढरपूरला वारीला जातात.
9/10

कैलास उगले हे सेवानिवृत्त सैनिक आहेत.
10/10

विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांच्या कुटुंबीयांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहेत.
Published at : 06 Jul 2025 12:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























