Belgaum : बेळगावात कन्नड संघटनांची गुंडगिरी, महाराष्ट्र एकीकरण समितिच्या कार्यक्रमात गोंधळ
महाराष्ट्र एकीकरण समितिच्या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीने केला असून मध्यरात्री दीड वाजता महामेलाव्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ उभारले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बेळगाव येथील सुवर्ण सौध मध्ये सोमवारपासून कर्नाटक विधानसभेच्या विधी मंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे.या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचे ठरवले आहे.महामेलाव्याला पोलीस खात्याने परवानगी दिली नसली तरी महामेळावा घेण्याचे ठरवले आहे.महामेळावा व्ह्याक्सिन डेपो मैदानावर होणार असून पोलीस खात्याने तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आकरा वाजता मेळवा आयोजीत करण्यात आलेला आहे. जत्तीमठ येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली.या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
बेळगाव वरील आपला हक्क सांगण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकारने सुवर्ण सौध ही विधी मंडळाची इमारत कोट्यवधी रुपये खर्चून उभारली आहे.दरवर्षी कर्नाटक सरकार येथे दहा दिवसाचे हिवाळी अधिवेशन घेत आहे.गेली दोन वर्षे कोरो ना प्रादुर्भावामुळे अधिवेशन घेण्यात आले नव्हते. यावर्षी प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दोन वर्षांनी बेळगावात अधिवेशन घेण्यात येत आहे.