एक्स्प्लोर

Justice Chandiwal EXCLUSIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत

Justice Chandiwal EXCLUSIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत

मविआ सरकारच्या काळातील 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी नंतरच्या काळात 'तेरी भी चूप, मेरी भी चूप', असे धोरण अंगिकारले होते. या प्रकरणात मी कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही. साक्षी आणि पुरावे असूनही ते दिले गेले नाहीत. ते पुरावे मिळाले असते तर पुढे काहीतरी घडले असते. माझ्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. ठाण्याचे एक डीसीपी सातत्याने या सगळ्यात हस्तक्षेप करत होते. कोण कोणाला वाचवतंय किंवा अडचणीत आणू इच्छित आहे, हे कळायला मार्ग नव्हता, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चांदीवार यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या.  या मुलाखतीमध्ये निवृ्त्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सचिन वाझे यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सचिन वाझे यांनी शपथपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे पुरावे सादर केले असते तर अनेक बाबींचा उलगडा झाला असता. सचिन वाझे यांनी आपल्या शपथपत्रात अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव घेतले होते. पण मी वाझेंना सांगितले होते की, मी हे रेकॉर्डवर घेणार नाही. तुम्ही प्रतिज्ञापत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचा उल्लेख केला असला तरी मी त्यांना चौकशीसाठी समन्स काढणार नाही. सचिन वाझे हे याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांनाही मी फडणवीसांचे नाव रेकॉर्डवर घेणार नाही, असे सांगितले. मोठी नावं घेतली की प्रसिद्धी मिळते, प्रसारमाध्यमांवर त्याची चर्चा होते. मला हे टाळायचे होते, असे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले.  सचिन वाझे यांनी शपथपत्रात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींवरुन नंतर घुमजाव केले. त्यावेळी ठाण्याचे एक डीसीपी चौकशीत सतत हस्तक्षेप करायचे. त्यावेळी मला माहिती न देता परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची मिटिंग झाली होती. याप्रकरणाची चौकशी होऊन या दोघांना आणण्यासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचीही भेट झाल्याचे मला समजले.  मला निरपेक्ष बुद्धीने चौकशी करायची होती. राजकीय साठमारीसाठी अनेक गोष्टी होतात. सचिन वाझे यांनी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, सचिनजी कुठेतरी थांबा. कोणाला आयुष्यातून उठवण्याचा काम करु नका, असे मी वााझेंना सांगितल्याचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले.  माझ्या अहवालातील बाबी शासनाच्या पचनी पडणाऱ्या नव्हत्या. त्यामध्ये अनेक विस्फोटक गोष्टी होत्या, असेही निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget