एक्स्प्लोर
Satara Doctor Case : 'SIT चौकशी झालीच पाहिजे', MARD चा संप तीव्र, सरकारवर दबाव
फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 'आमची मूळ मागणी आहे की एसआयटी (SIT) गठन झाले पाहिजे, कारण आम्हाला निष्पक्ष निकाल हवा आहे,' असं आंदोलक डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, नागपूरमध्ये शासकीय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 1200 हून अधिक निवासी डॉक्टर संपावर आहेत. जोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या संपामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत, मात्र आपत्कालीन सेवा सुरू आहेत. डॉक्टरांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















