एक्स्प्लोर
Vote Fraud: 'हा सगळा फ्रॉड झालेला आहे', मतदार यादीतील ५० लाखांच्या वाढीवर Jitendra Awhad यांचा हल्लाबोल
मतदार यादीतील कथित घोटाळ्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि खासदार नरेश मस्के (Naresh Maske) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'हा सगळा फ्रॉड झालेला आहे, इलेक्शन कमिशनने मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून ठेवलाय,' असा थेट आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विधानसभेनंतर अचानक पन्नास लाख मतदार कसे वाढले आणि मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर टक्केवारी १५ टक्क्यांनी कशी वाढते, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे, शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी मतदार यादीतील घोळ काँग्रेसच्या काळापासून सुरू असल्याचा आरोप केला आहे. दुबार आणि तिबार नावे असण्याचा प्रकार आताचा नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या वादामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















