Kasoda Cash Car : कसोदा गावातल्या एका कारमध्ये आढळली दीड कोटींची रोकड
Kasoda Cash Car : कसोदा गावातल्या एका कारमध्ये आढळली दीड कोटींची रोकड
निवडणूक पार्शवभूमीवर जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत तपासणी करत असताना एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कार मध्ये दीड कोटीची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान कारमधून दीड कोटीची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखाची रोकड सापडली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती?,याचा खुलासा होऊ शकला नाही.पोलीस याचा शोध घेत आहेत