Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांनी दिला अधिवेशना दरम्यान आंदोलनाचा इशारा
एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी मुंबईतील चांदिवली येथील सभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मी मुंबईत येऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली. पण मी अखेर मुंबईत आलो. रॅली दरम्यान पोलिसांनी अनेकदा अडवलं. औरंगाबादवरुन आम्ही 225 गाड्या घेऊन आलो. अनेक ठिकाणी आम्हाला आडवलं. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे पुढे नाही जाऊ देणार, असं सांगितलं गेलं. पण आम्ही मुंबईत आलोच. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. ते फक्त आदेश मानत होते. त्यात त्यांची काहीच चूक नव्हती, असे इम्तियाज जलील म्हणाले. मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आरक्षणासाठी काढलेल्या रॅलीमध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. त्यात ना शिवसेना, भाजप, काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याच पक्षाचे लोक नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल, असे जलील म्हणाले.