एक्स्प्लोर
पती प्लॅटफॉर्मवरच राहिला, पत्नीने धावत्या ट्रेनमधून घेतली उडी; रेल्वे अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवाशांचा अपघात ही मोठी समस्या बनली आहे. अनेकदा प्रवाशांची चूकच याला कारणीभूत ठरते. आज पुन्हा एकदा मुंब्रा आणि कर्जत रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून प्रवाशी पडल्याची घटना घडली
Mumbai local khopoli train
1/8

मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवाशांचा अपघात ही मोठी समस्या बनली आहे. अनेकदा प्रवाशांची चूकच याला कारणीभूत ठरते. आज पुन्हा एकदा मुंब्रा आणि कर्जत रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून प्रवाशी पडल्याची घटना घडली आहे.
2/8

रायगडच्या कर्जत रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या महिलेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. या महिलेला रेल्वे पोलिसांनी पकडल्यामुळे सुदैवाने महिलेचे प्राण वाचले.
3/8

कर्जत रेल्वे स्थानकातील हा प्रकार अंगावर शहारा आणणार आहे. सुनैना अखिलेश यादव (वय 25) अस या महिलेचे नाव असून त्यांचे पती अखिलेश यादव (वय 34), रा.शास्त्रीनगर, खोपोली येथील रहिवासी आहेत.
4/8

यादव पती-पत्नी हे दोघे कर्जत रेल्वे स्थानकावर त्यांनी दुपारी 3.15 वाजताची कर्जत–खोपोली लोकल पकडत असताना त्यांचे पती अखिलेश यादव हे काही कारणास्तव प्लॅटफॉर्मवर उतरले.
5/8

पती प्लॅटफॉर्मवर राहिल्यामुळे रेल्वेच्या डब्यात गर्दीमुळे अडकून पडलेली सुनैना यांनी धावत्या रेल्वेतूनच प्लॅटफॉर्मवर उडी मारली, त्यावेळी तेथे असलेल्या एका रेल्वे पोलिसाने त्यांना वेळीच पकडल्याने त्यांचा जीव वाचला.
6/8

दुसरीकडे मुंब्रा रेल्वे फास्टट्रॅकवरती 'त्या' वळण मार्गावरती पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल मार्गावर हा अपघात झाला.
7/8

अपघातात 40 ते 45 वर्षीय अज्ञात पुरुषाचा रेल्वे ट्रॅकवर अपघात झाला असून गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठा अपघात झाला होता.आज पुन्हा त्याच ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
8/8

सध्या या व्यक्तीवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार व्यवस्थित न मिळाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे हलवण्यात येणार आहे.
Published at : 05 Jul 2025 09:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
























