Web Exclusive : राणेंची अटक कायद्यात बसत नसती, तर कोर्टानं मान्य केली नसती : Deepak Kesarkar
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता जशी भाषण केली जातात, तशी यापूर्वीही केली असती तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशांतता झालीच नसती. यात्रा ही लोकांच्या समृद्धीसाठी पाहिजे ना आणि आज जी काही राणेंची भूमिका बदलेली आहे, त्यात न्यायालयाचा फार मोठा वाटा आहे. न्यायालयाने सांगितले की, भडक भाषण होता कामा नयेत. म्हणून अशी भाषणं होत आहेत आणि पॉझिटिव्ह भूमिका आली. राणेंची यापुढे भूमिका अशीच राहावी, त्यासाठी मी 17 सप्टेंबरपर्यंत वाट पाहीन. 17 तारखेला हायकोर्टाचा निकाल येणार आहे. राणेंची 17 तारखेनंतर भूमिका बदलली नाही, तर या विकासाच्या संघर्षाबरोबर राजकीय संघर्षसुद्धा करावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.























