मुंबईत दररोज किती ड्रग्जची विक्री होते? निवृत्त पोलीस अधिकारी सुहास गोखले यांची विशेष मुलाखत
Mumbai Drugs Case Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कालची रात्र आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
दरम्यान शाहरुख खान आणि आर्यन खानचं फोनवर बोलणं झालं असल्याची माहिती आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत लँडलाईन वरून 2 मिनिटांचं शाहरुख आणि आर्यनचं बोलणं झालं. आर्यन खान चौकशी दरम्यान सतत रडत आहे अशीही माहिती मिळाली आहे. तर आर्यन गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्स घेत असल्याचं चौकशीत उघड झालं आहे. तर भारताबाहेर युके, दुबई आणि इतर देशात सुद्धा आर्यनने ड्रग्सचं सेवन केलं आहे. आर्यन आणि अरबाज हे 15 वर्षांपासून मित्र आहेत.