एक्स्प्लोर
Parbhani heaavy rainfall : परभणीला पुन्हा पावसान झोडपलं, उरलेली पिकंही चिखलात जाण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यामध्ये पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यातील शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत. यामुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. उरलेली पिकेही आता पूर्णपणे चिखलामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. सोयाबीनसह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे आता उरलेली पिकेही पूर्णपणे वाया जाण्याचा धोका शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. पुराच्या वेळेस सावरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















