Haribhau Rathod on Amit Shah : युतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण बंद
Haribhau Rathod on Amit Shah : युतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण बंद
हेही वाचा :
तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील (Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha) महायुतीतील अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे संजय काका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढवला आहे. "एक मत, दोन आमदार" असे म्हणत संजय काका पाटील गटाकडून आता नेटाने प्रचार करण्यात येतोय. संजयकाका पाटील यांना निवडून द्या, कवठेमहांकाळ मधून आणखी एक आमदारकी भेटेल या अनुषंगाने आता प्रचार करण्यात येतोय. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय काका पाटील गटाला कवठेमंकाळच्या अजितराव घोरपडे गटाने पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा देताना अजित पवारांनी घोरपडेंना देखील आमदारकी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संजय काकाना मत देताना आणि त्यांना निवडून आणताना तासगाव आणि कवठेमहांकाळ मधून एक-एक आमदार बनेल, असा विश्वास मतदारासमोर व्यक्त करत प्रचार करण्यात येतोय. रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील! तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजय पाटील आहेत. मात्र, रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एक नाव असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, रोहित रावसाहेब पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे. दरम्यान, नावात समानता असलेले उमेदवार दिल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले की राहुल पाटील यांना निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी खूप प्रयत्न होणार आहेत. आर आर आबा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असताना आर आर पाटील नावाचे चार चार उमेदवार निवडणुकीमध्ये असायचे. पूर्वी एखादा माणूस चुकत होता. मात्र आता मतपेटीवर फोटो येणार आहे. त्यामुळे रोहित पाटील यांची छबी दिसणाऱ्या पुढे बटन दाबून मतदान करतील असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.