Sanjay Raut Full PC : बीडचं पालकमंत्रिपद कुणालाही दिलं तरी देशमुखांना न्याय मिळणार का?
Sanjay Raut Full PC : बीडचं पालकमंत्रिपद कुणालाही दिलं तरी देशमुखांना न्याय मिळणार का?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळं त्यामागे काही राजकीय हेतू होता असं काही नसतं. वैयक्तिक स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आप आपल्या लोकांना मंत्रिपद मिळावं, मलाईदार खाती मिळावी, आपला आणि पक्षाचा आर्थिक गल्ला भरला राहावा म्हणून हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. म्हणून जागा वाटपापासून ते पालकमंत्री पदापर्यंत त्यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. कुणाला बीडचं पालकमंत्री पद मिळाल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? परभणी चा पालकमंत्री पद कोणाला मिळालं तर पोलीस पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सूर्यवंशी यांना न्याय मिळणार आहे का? मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांवरून महायुतीत घमसान सुरू आहे.
कल्याणचे पालकमंत्री पद एखाद्याला मिळाले तर तिथल्या मराठी माणसाला स्वस्तात घर मिळणार आहेत का? फक्त सत्ता आपल्या हाती असावी, या भागात होणारे आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्या हाती असावी म्हणुन पालकमंत्र्यांवरून वाद आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवं असतं, मात्र ते काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवं नसतं. तर गडचिरोली मध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, कोट्यावधी रुपयांचे उद्योग आहेत, त्यातून मलिदा मिळवा त्यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली आहे.