गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवं असतं, कारण....; संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका
गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवं असतं. मात्र त्यातून मलिदा मिळवा त्यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
Sanjay Raut मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळं त्यामागे काही राजकीय हेतू होता असं काही नसतं. वैयक्तिक स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आप आपल्या लोकांना मंत्रिपद मिळावं, मलाईदार खाती मिळावी, आपला आणि पक्षाचा आर्थिक गल्ला भरला राहावा म्हणून हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. म्हणून जागा वाटपापासून ते पालकमंत्री पदापर्यंत त्यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. कुणाला बीडचं पालकमंत्री पद मिळाल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? परभणी चा पालकमंत्री पद कोणाला मिळालं तर पोलीस पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सूर्यवंशी यांना न्याय मिळणार आहे का? मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांवरून महायुतीत घमसान सुरू आहे.
कल्याणचे पालकमंत्री पद एखाद्याला मिळाले तर तिथल्या मराठी माणसाला स्वस्तात घर मिळणार आहेत का? फक्त सत्ता आपल्या हाती असावी, या भागात होणारे आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्या हाती असावी म्हणुन पालकमंत्र्यांवरून वाद आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवं असतं, मात्र ते काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवं नसतं. तर गडचिरोली मध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, कोट्यावधी रुपयांचे उद्योग आहेत, त्यातून मलिदा मिळवा त्यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली आहे.
गृहनिर्माण खातं सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आहे की बिल्डरांच्या?
गडचिरोली चंद्रपूर इत्यादी भागांमध्ये प्रचंड वनसंपदा आहे. त्यातून आपल्याला लाभ व्हावा यासाठी तेथील पालकमंत्र्याच्या पदावरून वाद सुरू आहे. मुंबईचा पालकमंत्री पद मंगल प्रभात लोढा किंवा अन्य कुणाला मिळाल्यास मुंबईतील मराठी माणसांना स्वस्तात घर मिळणार आहेत का? गृहनिर्माण खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. काय सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आहे की बिल्डरांच्या हे तपासले पाहिजेत. अनेक प्रश्न सर्वसामान्यांचे आहे ते त्यातून सुटणार आहेत का? असा प्रश्न हीखासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे ऑइडॉल
राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरनंअनेक चर्चा सुरू आहेत. ही चर्चा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे. कारण मी राज ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले आहे. त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं जवळचं नातं राहिला आहे. माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हेही माझ्या अतिशय जवळचे आणि मोठ्या भावाप्रमाणे आहेत. दरम्यान काल दोघे भाऊ एकत्र आले त्याचे निश्चित महाराष्ट्राला आनंद झाला असेल. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम आहे. जनतेचे दोन्ही भावंडांवर जीवापाड प्रेम आहे. त्याच दृष्टीने मराठी माणूस त्यांच्याकडे बघत असतो. दोघांचे पक्ष वेगळे आहेत. मात्र राज ठाकरे यांचे अमित शाह,नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस हे ऑइडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसें नाही. महाराष्ट्रावर अन्याय करणारे, आमचा पक्ष फोडणारे हे लोक आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकतं नाही. तुमच्यात वैचारिक मतभेद आहेत. कुटुंब म्हणुन मात्र आम्ही कायम एक आहेत. असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा