एक्स्प्लोर

राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'

सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते.

Parbhani: परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे पडसाद राज्यभर उमटले. विधिमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचा पाहायला मिळाल्यानंतर आज परभणीत राहुल गांधींसह शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही सोमनाथच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यास येणार आहेत.  परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे राजकीय घटनांना वेग आला आहे. आता राहुल गांधींचा उपस्थितीवर अक्षय घेत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. परभणीतील घडामोडी, न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येत आहेत का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस गेल्या 70 75 वर्षात संविधानाची मोडतोड केली म्हणून राहुल गांधी यांनी आज परभणीत देशाची माफी मागावी असेही आशिष देशमुख म्हणाले. 

सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते. विधिमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत दाखल होतील. 

परभणीत येऊन जातीय विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न ?

परभणीतील घडामोडीनंतर न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येतात का असा सवाल भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला. ते म्हणाले, परभणीत मनो रुग्णाने जी कृती केली त्याचा आम्ही सर्व निषेध करतो. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत 80 वेळा संविधान बदललं. त्यामुळे परभणीत येऊन राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. त्यांच्या आजीने स्व. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून लोकशाहीला धाब्यावर बसवलं. काँग्रेस गेल्या 70 -75 वर्षात संविधानाची तोडमोड केली म्हणून राहुल गांधींनी आज परभणी देशाची माफी मागावी असेही देशमुख म्हणाले. 

सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं करणार सांत्वन 

काँग्रेस नेते राहुल गांधी आज दुपारी दोन वाजता परभणीत दाखल होतील. प्रथम ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटून परिस्थिती समजून घेणार आहेत. त्यानंतर विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट ते घेतील. तत्पूर्वी शिवसेना गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दुःखात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानियाSantosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चाMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Nashik Crime : गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
गुजरातमधील बहीण भावाचा सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून पर्दाफाश
Panipuri GST Notice : पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
पाणीपुरीवाल्याचा ऑनलाईन पेमेंटचा आकडा पाहून जीएसटी विभागाला कडाक्याच्या थंडीत दरदरुन घाम सुटला! थेट नोटीस धाडली
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
Embed widget