Gondia : गोंदियात तिकीट मशिनचा स्फोट; महिला जखमी, तिकीट व्हेंडींग मशीन कितपत सुरक्षित? ABP Majha
गोंदिया : गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाला आहे. या अपघातात एका महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या मशीन संदर्भात अनेक तक्रारी होत असताना आता त्यातच ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकासोबत प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तिकीट वेंडिंग मशीन दिसायला छोटे आणि साधे वाटत असले तरी पण वाहक आणि प्रवाश्यांसाठी धोकायदायक झाले आहे. कारण गोंदियात एका महिला वाहकासाठी हा बॉम्ब ठरला आहे. ह्या वेंडिंग मशीनचा ब्लास्ट होऊन महिला वाहकाला दुखापत झाली आहे. कल्पना मेश्राम असे जखमी झालेल्या वाहकाचे नाव आहे. कल्पनाच्या हातातले तिकीट वेंडिंग मशीन अचानक फुटले. या घटनेला तीन दिवस उलटले असूनही आजही कल्पना ही घटना विसरू शकत नाहीये.





















