एक्स्प्लोर

Girish Mahajan Majha Katta : एकनाथ खडसेंचं चॅलेंज स्वीकारुन गिरीश महाजन 'माझा' कट्ट्यावर #abpमाझा

Girish Mahajan Majha Katta : एकनाथ खडसेंचं चॅलेंज स्वीकारुन गिरीश महाजन 'माझा' कट्ट्यावर #abpमाझा

मुंबई : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) मोठा गौप्यस्फोट केला होता. एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप (BJP) नेत्याची नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर माझ्या मोबाईलमधून ती क्लिप डिलीट झाली, असे त्यांनी म्हटले होते. यावरून आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा, असे ओपन चॅलेंज माझा कट्ट्यावर दिले आहे. 

एकनाथ खडसे यांच्याकडे ज्यात भाजपचे नेते अश्लील चाळे करतानाची क्लिप होती याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे माझ्याबद्दलच बोलत आहेत. मला हे कळत नाही ते कधीपासून म्हणत आहे तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन. मी त्यांना आव्हान केले होते की, तुम्ही ती सीडी बाहेर काढाच. ईडी लागेल की नाही ते मला माहित नाही. पण, दुर्दैवाने त्यांना ईडी लागलीच. त्यांच्या जावयांना अडीच वर्ष जेलमध्ये जावे लागले. तुमच्याकडे काही होतं तर मग तुम्ही बाहेर का काढलं नाही, असे त्यांनी म्हटले. 

मोबाईलमधून गायब करायला मी काय हॅकर आहे का?

ते पुढे म्हणाले की, आपलं कुणाकडून काही वाकडं होत नसेल तर असले आरोप करायचे. कमरेखालचे वार करायचे हा त्यांचा धंदा आहे. वाटेल तसे घाणेरडे बोलायचे हा त्यांचा उद्योग आहे. कोट्यावधी लोक आपल्याला बघत आहेत. याचं त्यांना काहीच वाटत नाही. मी जे बोलेल ते ऐका असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून मी त्यांना आव्हान केलं होतं की, तुम्ही तुमच्याजवळची सीडी दाखवा. तुम्ही लोकांना संभ्रमात ठेवू नका. माझ्याबद्दल जर का त्यांच्याकडे काही असेल तर ते त्यांच्या फोनवरून सहजासहजी गायब होईल का?  त्यांच्या मोबाईलमधून गायब करायला मी काय हॅकर आहे का? हे शक्य आहे का? त्यामुळे ते जे बोलत आहेत त्यात अजिबात तथ्य नाही. 

एकनाथ खडसे आणि माझी नार्को टेस्ट करा

एकनाथ खडसे आणि माझी दोघांची नार्को टेस्ट करा. हे मी जबाबदारीने बोलत आहे. तुम्ही त्यांना विचारा सत्य काय आणि मला पण विचारा सत्य काय आहे. वारंवार भाषणांमध्ये वाईट बोलायचे, माझ्यावर अश्लील आरोप करायचे. माझं ते बाकी काहीच करू शकत नाही. माझ्या खात्याबद्दल काही बोलू शकत नाही. माझ्यावर आरोप करायला त्यांच्याकडे एक शब्द सुद्धा नाही. आपल्याकडून याचं काही वाकडं होत नाही, त्यामुळे हवेत गोळीबार करायचे.

संकट मोचक म्हणून माझं कौतुक करतात म्हणून ते अस्वस्थ

काल ते जामनेरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत माझ्याबद्दल इतके वाईट बोलले की, ते मी इथे सांगू पण शकत नाही. माणूस असं कसं करू शकतं? त्यांची मानसिक स्थिती अत्यंत बिघडली आहे. त्यांना आपण काय करावं हे कळत नाही. त्यामुळे ते मला आणि देवेंद्रजींना टार्गेट करण्याचे काम करतात. बोलायला माझ्याकडे पण चार गोष्टी आहेत. पण, आपल्याला जनाची नाही तर मनाची तरी आहे. तुम्ही माझ्या कामावर बोला. आरोप करा ते सिद्ध करून दाखवा. पण, त्यात मी कुठे सापडत नाही. सगळे लोक मला संकट मोचक म्हणून माझं कौतुक करतात, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मात्र यात त्यांचा दोष नाही, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखल
Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND VS AUS : कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्यागBJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND VS AUS : कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Embed widget