भूगर्भातून येणार्या आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत, बीडमधील आवरगाव, लाडझरी गावकऱ्यांनी रात्र काढली जागून, तज्ञ म्हणाले...
भूगर्भातून येणार्या आवाजामुळे ग्रामस्थ झाले भयभीत.. आवरगाव आणि लाडझरी या गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. मागच्या दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातून येणाऱ्या आवाजाचा प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे या आवाजामुळे लोक भयभीत होत आहेत विशेषतः रात्री होणाऱ्या आवाजामुळे ग्रामस्थ अक्षरश: रात्र जागून काढत आहेत.. धारूर तालुक्यातील सावरगाव मध्ये त्यानंतर परळी तालुक्यातील नागझरी येथे भूगर्भातून मोठ्या आवाज ऐकायला मिळत आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे..मात्र हे डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आवाज असल्याचे भूजल तज्ञ सांगत आहेत..भूस्तरातील पोकळीमध्ये पावसानंतर भूजल व हवेची पोकळी यामधील परस्परक्रिया घडून येत असल्याने त्यावेळी आवाज ऐकायला येतात असं भूजल तज्ञांनी सांगितले आहेत




















