एक्स्प्लोर

Sanjay Shirsat Income Tax notice: संजय शिरसाटांना हॉटेलचं प्रकरण भोवलं, आयकर खात्याची नोटीस, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Sanjay Shirsat IT Notice: छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत.

Sanjay Shirsat Income Tax notice: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर नेते संजय शिरसाट यांना आयकर खात्याने नोटीस धाडली आहे. आतापर्यंत केवळ विरोधकांकडे वक्रदृष्टी फिरवणाऱ्या तपास यंत्रणेने पहिल्यांदाच सत्ताधारी मंत्र्याला चौकशीची नोटीस धाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स  हॉटेलच्या (VITS Hotel) लिलावात झालेल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरुन शिरसाट (Sanjay Shirsat) तपासयंत्रणेच्या कचाट्यात सापडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत कुरघोडीचे राजकारण रंगल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांना आलेल्या आयकर विभागाच्या नोटीसला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता आयकर विभाग संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या सगळ्यातून काय निष्पन्न होणार, हेदेखील बघावे लागेल. (Chhatrapati Sambhaji Nagar News)

संजय शिरसाट यांनी आपल्याला आयकर खात्याची (Income Tax) नोटीस आल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. तपास यंत्रणेला जी माहिती हवी आहे, ती आम्ही देणार आहोत.  त्यांना वाटत आहे की, आधीची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये माझी संपत्ती इतकी वाढली कशी? त्यांना जे जे प्रश्न पडले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एजन्सीला मी देणार आहे. मला अलीकडेच ही नोटीस आली आहे. नऊ तारखेला मला या सगळ्यावर उत्तर द्यायचं होतं, पण मी त्यासाठी वेळ मागितली आहे.  आम्हाला सुद्धा यंत्रणांच्या नोटीस येतात किंवा त्यांची कारवाई होते. आत्ताच ही नोटीस का आली हे माहिती नाही. पण जर नोटीस आली असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

आता यापुढे ब्लॅकचे पैसे (Black money) चालणार नाहीत. हे वक्तव्य माझ्यासाठी असल्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटले. 2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली?,असा प्रश्न आयकर खात्याला पडला आहे. सध्या पैसे कमावणे सोपं आहे. मात्र, ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याची भावनाही संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली. 

आणखी वाचा

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy: संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांनी लगेच उच्चस्तरीय चौकशी लावली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget