एक्स्प्लोर

Sanjay Shirsat Property : हॉटेलसाठी तब्बल 67 कोटींची बोली, पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढली; आता आयकर विभागाची नोटीस, मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?

Sanjay Shirsat Property : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Shirsat Property : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) व्हिटस् हॉटेल (VITS Hotel) प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर खळबळजनक आरोप होत आहे. त्यातच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द संजय शिरसाट यांनीच आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस आल्याची जाहीर कबुली एका कार्यक्रमात दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आरोपानुसार, विट्स हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे 110 कोटी रुपये असताना, संजय शिरसाट यांच्या मुलाने ते केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतले, अशी टीका विरोधकांनी केली होती. 

पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढली

या वादानंतर, संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा सोडला नाही आणि तो पावसाळी अधिवेशनात सभागृहात उचलून धरला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे जाहीर केले होते. यानंतर आता संजय शिरसाट यांनी आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी 2024 सालच्या विधानसभा विधानसभा निवडणुकीवेळी संपत्तीचे विवरणपत्र सादर केले होते. यात त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात एकूण 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात संजय शिरसाट यांची एकूण संपत्ती किती? 

संजय शिरसाट यांची संपत्ती (Sanjay Shirsat Property)

जंगम संपत्ती 

2019 मध्ये 1.21 कोटी 

2024 मध्ये 13.37 कोटी 

स्थावर संपत्ती 

2019 मध्ये 1.24 कोटी

2024 मध्ये 19.65 कोटी

सोने

2019 मध्ये 16 कोटी

2024 मध्ये 1.42 कोटी

ठेवी

2019 मध्ये 5 लाख

2024 मध्ये 81 लाख

वाहने 

2019 मध्ये 85 लाख

2024 मध्ये 18 लाख

संजय शिरसाट यांची जाहीर कबुली 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली.  आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचेही देखील त्यांनी म्हटले. 2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं विचारल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले. याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केले होते. 

आयकर विभागाच्या नोटीसीला उत्तर देणार : संजय शिरसाट

संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की,  एजन्सीला जी माहिती हवी आहे, ती माहिती आम्ही देणार आहोत. त्यांना वाटत आहे की, आधीची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये माझी संपत्ती कशी वाढली? त्यांना जे जे प्रश्न पडले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एजन्सीला देणार आहे. मला अलीकडेच ही नोटीस आली आहे. नऊ तारखेला मला या सगळ्यावर उत्तर द्यायचं होतं. पण, मी त्यासाठी वेळ मागितला आहे. आम्हाला सुद्धा यंत्रणांच्या नोटीस येतात किंवा त्यांची कारवाई होते. आत्ताच ही नोटीस का आली? हे माहित नाही. पण, जर नोटीस आली असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy: संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांनी लगेच उच्चस्तरीय चौकशी लावली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget