Nana Patole यांच्या विरोधात भाजप आक्रमक, नाशिकमध्ये गुन्हा दाखल
मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालीय. पटोलेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत केलीय. तर याच मुद्यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारलाही लक्ष्य केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जशी कारवाई केली तशी कारवाई पटोलेंवर करावी असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. राणेंच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी पहिला गुन्हा नाशिकमध्येच दाखल झाला होता. तर नागपुरातही पटोलेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान वादानंतर पटोले यांनी यूटर्न घेतलाय. पंतप्रधानांबाबत नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोललो असं स्पष्टीकरण पटोले यांनी दिलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
