एक्स्प्लोर

Amravati Violence : राजकमल चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, EXCLUSIVE दृश्य

Maharashtra Tripura violence Update : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले.  ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. 

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. नांदेड शहरात काल मुस्लिम समाजानं काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागलं. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत.  

त्रिपुरातील कथीत हिंसाचाराचा निषेधार्थ काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळी एका युवकाला मारहाण करण्यात आली. तसंच आंदोलकांकडून एका दुकानातही मारहाणीची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

दरम्यान मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली.

भिवंडीतही काल मुस्लिम समाजानं बंद पुकारला होता. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.

त्रिपुरातील कथित घटनांचं भांडवल करुन अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये निघालेले मोर्चे आणि त्यातून झालेली दगडफेक चिंताजनक आहे. राज्य सरकारनं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणावी असं ट्वीट देवेंद्र फडणीसांनी केलं आहे. दरम्यान त्रिपुरात झालेल्या घटनेचा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय. महाराष्ट्रात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचाही निषेध करत असल्याचं खासदार जलील यांनी म्हटलंय..मालेगावमध्ये पोलीस परवानगी नसताना काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. हिंदुना घाबरवलं जात आहे. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प का असं ट्वीट नितेश राणेंनी केलंय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?
Mumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget