डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे.

ठाणे : डोंबिवलीच्या (Dombivali) शास्त्री नगरमधील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन आरोपींना आज कल्याण न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सर्वच आरोपींची सुटका झाली आहे. मात्र, न्यायालयाने (Court) काही अटी व शर्तींसह हा जामीन दिल्यामुळे आरोपी रमेश म्हात्रेला डोंबिवलीत थांबता येणार नाही. त्यामुळे, रमेश म्हात्रे आज थेट महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात येण्यास बंदी असल्याने रमेश म्हात्रे थेट गोव्याला रवाना झाले आहेत.
रमेश म्हात्रे यांची आधारवाडी कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाले. हायकोर्टाच्या आदेशानुसार चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांना गोव्यातच राहावे लागणार असून, अंजुना पोलीस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावावी लागणार आहे.रमेश म्हात्रे यांच्यासह तीन पुरुष आरोपींना जामीन मिळाला आहे, तर महिला आरोपी अद्याप आधारवाडी कारागृहातच आहे.दरम्यान, पोलिसांना तपास जलदगतीने पूर्ण करून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या सुनावणीत रमेश म्हात्रेने उच्च न्यायालायाकडे जामीनासाठी विनंती केली होती. मला महाराष्ट्राबाहेर ठेवा, पण जामीन द्या, अशी विनंती म्हात्रेंनी केली होती. अखेर, त्याची जामीनावर सुटका झाली आहे.
हेही वाचा






















