एक्स्प्लोर
Farmers Protest: 'मागण्या पूर्ण होत नसतील तर 4-5 मंत्र्यांना कापा', शेतकरी नेते Ravikant Tupkar यांची संतप्त भावना
शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला असून, सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) मिळणारा कमी भाव व कर्जमाफीच्या (Loan Waiver) मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मी जे बोललो ही महाराष्ट्रातल्या संतप्त शेतकऱ्यांची भावना आहे, जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर चारपाच मंत्र्यांना कापा,' असे खळबळजनक वक्तव्य तुपकर यांनी केले आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च आठ हजार रुपये असताना केवळ साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे, तर कापसालाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने जगायचे कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वर्ष उलटले तरी कर्जमाफी दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे, असेही ते म्हणाले. नेपाळप्रमाणे मंत्र्यांना देश सोडून जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, असा थेट इशाराही तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement





















