Educational Admissions | आरक्षण स्थगितीमुळे रखडलेली रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरु होणार
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्या होती. त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.






















