(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : राज्यात दारू विकणाऱ्यांचं सरकार, दारूवरचा कर सरकारनं 50% केला कमी
हे दारू विकणाऱ्यांचं सरकार असल्याच्या गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार वर केला आहे. ते भंडारा येथे स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी प्रचारात आले असतांना त्यांनी जाहिर सभेत हा आरोप केला आहे. कोरोना काळात ह्या सरकार ने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही. मात्र लॉक डाउन शिथील होताच सर्व बार मालक शरद पवार कड़े गेले व मदत करण्याची मागणी केली तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकार ने लायसन्स फीस कमी करवून घेतली. एवढ्यावर हे सरकार न थांबता दारू च्या खप वाढविन्यासाठी विदेशी दारू 50 टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यांमुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार असल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. गोंदियाच्या सभे प्रमाने ह्यावेळी त्यांनी बोनस बाबत सरकारची खिल्ली उडविली असून भाजपा सरकार मध्ये सुरुवात केलेली धानाची बोनस प्रक्रिया हे पुढे चालवु न शकल्याचे त्यांनी सांगितले आहे. ह्यावेळी त्यांनी नाना पटोले रोज संविधान खतरे में म्हणतात मात्र धान उत्पादक़ शेतकरी संकटात असतांना नाना बोलत नाही अश्या परखड़ शब्दात सुनविले आहे. ही सरकार रोज शेतकऱ्यांची विज कापत असून आम्ही 5 वर्षात एकही विज न कापल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.