एक्स्प्लोर
Devendra Fadanvis : 'Uddhav Thackeray यांंनी आरशात बघावं', मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशाप्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत,' असं थेट विधान फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या काळात केवळ वीस हजार कोटींची कर्जमाफी झाली, तर आमच्या सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं, ज्यातले एकवीस हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहेत, असं फडणवीस म्हणाले. ठाकरे सरकारने चालू खात्याच्या लोकांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, पण अडीच वर्षांत एक पैसाही दिला नाही. आमच्या सरकारने आल्यावर सोळा लाख शेतकऱ्यांचे ते पैसे दिले, असा दावाही त्यांनी केला. याशिवाय, राज्य आणि केंद्राचे मिळून बारा हजार रुपये आणि विम्याचे पैसे वेगळे दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे, मोर्चा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















