Devendra Fadnavis on Kartiki Ekadashi : सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद मिळो, माऊलीला साकडं
Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi 2023) पंढरपुरात (Pandharpur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्निक शासकीय पूजा संपन्न झाली. नाशिकचं घुगे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी साकडं घातलं. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठुराया चरणी घातलं आहे.




















