महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार जागांची भरती करणार : देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.























