एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Delhi Meetings | देवेंद्र फडणवीस दिल्लीत, कुणकुणाची भेट घेणार?
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही ते भेट घेतील. राज्यामध्ये कृषिमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे शिवराज सिंग चौहान यांच्याशी होणाऱ्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काल देवेंद्र फडणवीस जेएनयू विद्यापीठातील कार्यक्रमासाठी दिल्लीत आले होते. ते आजही दिल्लीतच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची काल नवी दिल्लीमध्ये भेट झाली. या भेटींमुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
















