एक्स्प्लोर
Powai Hostage Case: ज्या Rohit Arya चं PM आणि CM नी कौतुक केलं, तोच मुलांच्या अपहरणाचा सूत्रधार?
मुंबईच्या पवईमधील ओलीस नाट्यप्रकरणी आता एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये रोहित आर्य (Rohit Arya), 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' योजनेचा एक प्रमुख भाग होता. धक्कादायक बाब म्हणजे, 'ज्या रोहित आर्याचं पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कौतुक केलं होतं, तोच ऑडिशनसाठी आलेल्या सतरा मुलांना ओलीस ठेवल्याचा आरोपी आहे.' डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या सरकारी योजनेतील 'क्लीननेस मॉनिटर' (Cleanliness Monitor) उपक्रमाचे काम लेट्स चेंज प्रोजेक्टचा (Let's Change Project) संचालक म्हणून रोहित आर्याकडे होते. मुलांसाठीच्या सरकारी योजनेचा चेहरा असलेला आणि त्यासाठी प्रशंसा मिळवलेला इसमच मुलांच्या अपहरणाच्या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















