Deepak Kesarkar Tafa | संतप्त नागरिकांनी अडवला दीपक केसरकर, गिरीश महाजनांचा ताफा
Deepak Kesarkar Tafa | संतप्त नागरिकांनी अडवला दीपक केसरकर, गिरीश महाजनांचा ताफा
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा संतप्त नागरिकांनी अडवला. ताज रिसॉर्ट शिरोडा वेळागर भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता, मात्र याला काही नागरिकांचा विरोध दर्शवत ताफा अडवला. ताज रिसॉर्ट वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर भागातील सर्वे नंबर ३९ वगळण्यात यावा यासाठी स्थानिकांचा विरोध आहे. मात्र विरोध डावलून देखील स्थानिक आमदार तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन यांनी जबरदस्ती भूमिपूजन केलं असल्याने ताफा अडवला. गेली १२ ते १५ वर्ष हा भागातील स्थानिक सर्वे नंबर ३९ वगळण्यासाठी लढत आहेत. मात्र त्यांना आश्वासन देऊन बोळवण करून आज पर्यटन मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी भूमिपूजन केलं. याला विरोध करत ताफा अडवला. सर्वे नंबर ३९ ताज रिसॉर्ट मधून वगळण्याची स्थानिकांची मागणी.