Dasara Melava : नारायणगड आणि भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी
Dasara Melava : नारायणगड आणि भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दी
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर (Bhagwan Gad) मोठी गर्दी केली आहे. भगवान गडावर समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तर गडावरील भगवान बाबांच्या आकर्षक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भगवान गडावरील आजच्या भाषणात ओबीसी आणि मराठा संघर्षावर भाष्य करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही. गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली आहे.
![Padma Shri Award News : अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/ffcd0aa4c85f16e87a129be5ee29f7a317378251575831000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ashok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/9648b83b76a92eb480e11e6020459bbb17378243690671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Padma Awards 2025 : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाकोणाचा सन्मान?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/835eb6d1af1a7d6787c40806390625f617378169607781000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/16efaee2ba8c6eea5c14be338c3bd02b17378143397921000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/b344a31482bab9f7f9905824c5047d9417378127158141000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)