एक्स्प्लोर
Daily Wage Workers Protest | नाशिकच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, राज ठाकरेंच्या भेटीने तोडगा?
नाशिक येथील आदिवासी भवनासमोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत बिढाड आंदोलन सुरू आहे. वर्ग तीन आणि वर्ग चारचे हे रोजंदारी कर्मचारी आदिवासी आयुक्तालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आदिवासी आश्रमशाळेमध्ये काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी मंत्री आणि आमदारांनी आंदोलनाला भेट दिली होती, परंतु त्यांच्या भेटीनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता आंदोलनाचे प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या आंदोलनावर काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन गेल्या आठ दिवसांपासून सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















