Travis Head : ट्रेविस हेडनं मोहम्मद सिराजला दोन चौकार ठोकले, अर्शदीप सिंगकडून पहिल्याच बॉलवर करेक्ट कार्यक्रम, भारताला मोठं यश, पाहा व्हिडिओ
Travis Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावा करायच्या आहेत.

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिल्या वनडेत पावसानं व्यत्यय आणला आहे. यामुळं मॅचच्या षटकांची संख्या 50 वरुन 26 करण्यात आली आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 136 धावा केल्या. मात्र, डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी डावाची सुरुवात केली. ट्रेविस हेडनं पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजला दोन चौकार मारले. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) ट्रेविस हेडची विकेट घेतली.
अर्शदीप सिंगकडून ट्रेविस हेडचा करेक्ट कार्यक्रम
ट्रेविस हेडनं भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक फलंदाजी केलेली आहे.मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड यांच्यातील जुगलबंदी यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेडनं मोहम्मद सिराजला दोन चौकार मारले. यानंतर अर्शदीप सिंगच्या ओव्हरमध्ये ट्रेविस हेडला मैदान सोडून जावं लागलं. अर्शदीप सिंगला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ट्रेविस हेड झेलबाद झाला. हर्षित राणानं कॅच घेत ट्रेविस हेडला मैदानाबाहेर पाठवण्यात महत्त्वाची कामगिरी केली. यामुळं शुभमन गिलचं मोठं टेन्शन दूर झालं.
भारताच्या 9 बाद 136 धावा
रोहित शर्मा आणि विराट कोहली 224 दिवसानंतर टीम इंडियाच्या जर्सीत पाहायला मिळाले. मात्र, दोघेही चांगली कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला. तर, विराट कोहली एकही धाव करु शकला नाही. श्रेयस अय्यरनं 11 धावा केल्या. तर, अक्षर पटेल यानं 31 धावा केल्या. कॅप्टन शुभमन गिल 10 धावा करु शकला. यानंतर केएल राहुलनं 38 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 आणि नितीशकुमार रेड्डीनं 19 धावा केल्यानं भारत 136 धावांपर्यंत पोहोचू शकला. भारतानं 136 धावा केल्या असल्या तरी डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावा करायच्या आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल
भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते दोघे केवळ वनडे सामने खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदा मैदानावर उतरले. मात्र, ते दोघेही मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. रोहित शर्मानं 8 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं शुन्यावर बाद झाला. आता उर्वरित दोन मॅचमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहावं लागणार आहे.
Instant impact! 🤩#ArshdeepSingh's first ball to #TravisHead and #TeamIndia have their first wicket. 🙌#AUSvIND 👉 1st ODI | LIVE NOW 👉 https://t.co/FkZ5L4CrRl pic.twitter.com/wk0iE6Rgjq
— Star Sports (@StarSportsIndia) October 19, 2025





















