(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime Superfast News : क्राईम सुपरफास्ट घडामोडी : 14 Sep 2024 : ABP Majha
Crime Superfast News : क्राईम सुपरफास्ट घडामोडी : 14 Sep 2024 : ABP Majha
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड स्टार सलमान खानच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली जात आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र होते म्हणूनच त्यांची हत्या केल्याचं बिष्णोई गँगने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता सलमानच्या जीवालाही धोका वाढल्याने पोलिसांचे टेन्शन अधिकच वाढल्याचं दिसतंय. लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामधील वादाला कारणीभूत हे काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार आहे. या प्रकरणात सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.
Why Lawrence Bishnoi Want To Kill Salman Khan : सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोईचे वैर का?
सलमान खान आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये 1998 साली वैर सुरू झालं. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. या प्रकरणी खटला चालून 2018 साली सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. पण दोनच दिवसात तो 50 हजारांच्या जामीनावर बाहेर आला. यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज झाली.