(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CP Radhakrishnan oath as governor : सीपी राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ
CP Radhakrishnan oath as governor : सीपी राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ
सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते. सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सीपी राधाकृष्णन यांना खेळाचीही आवड सीपी राधाकृष्णन यांना खेळाची खूप आवड आहे. त्यांना टेबल टेनिस, क्रिकेट आणि व्हॉलिबॉल या खेळांची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांचं टेबल टेनिस आणि धावण्यात विशेष प्राविण्य होतं. 1978 मध्ये त्यांनी मदुराई विद्यापीठामधून बीबीएचं शिक्षण घेतलं होतं. तसेच राज्यशास्त्रात त्यांनी पीएचडी देखील केली आहे.