(Source: Poll of Polls)
Congress MLA : काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर ?
Congress MLA : काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर ? राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर काय म्हणाले? एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मी ई-पिक पाहणी अहवाला संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. राजकीय चर्चा केली नाही, अशी माहिती जितेश अंतापुरकर यांनी दिली. हिरामण खोसकर काय म्हणाले? मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं हिरामण खोसकर यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितलं. विधानपरिषेदत काँग्रेसची मतं फुटली- विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही. काँग्रेस हायकमांडचा उलटा गेम विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन गद्दारी करणाऱ्या या आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.