(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coastal Road : एकनाथ शिंदे पुढे, दादा-फडणवीस बॅक सीटवर, Vintage Car मधून कोस्टल रोडची सफारी
Coastal Road : एकनाथ शिंदे पुढे, दादा-फडणवीस बॅक सीटवर, Vintage Car मधून कोस्टल रोडची सफारी
मुंबईकरांसाठी (Mumbai News) आज अतिशय महत्त्वाचा दिवस. याचं कारण म्हणजे, वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचं (Coastal Road) आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला (Bandra Worli See Link) देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे. दरम्यान, आजच्या उद्गाटन सोहळ्याचं निमंत्रण वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Worli MLA Aditya Thackeray) आणि खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना देखील देण्यात आलं आहे.
एकूण 10.58 किमीचा मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे. यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या 4 आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये 3 + 3 अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण 4.35 किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही 2.19 किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे.