विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेस (Congress) पक्ष कठोर कारवाई करणार आहे. दिल्लीत (Delhi) झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mallikarjun Kharge Congress News : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेस (Congress) पक्ष कठोर कारवाई करणार आहे. दिल्लीत (Delhi) झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला 20 हून अधिक उमेदवारांनी, विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या आहेत.यावेळी ज्यांनी पक्ष विरोधी काम केलं आहे, त्यांच्यावर कठोर करण्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांच्या तक्रारींची दखल करुन काढल्या नोटीस
दरम्यान, प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांच्या तक्रारींची दखल करुन नोटीस काढल्या जात आहेत. आत्तापर्यंत बंटी शेळके, सुरज ठाकूर यांच्यासह काही जाणांना नोटीसा दिल्या आहेत. मुदतीत नोटीसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार स्थापन करणार आहे. येत्या 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, अद्याप राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घोषणा करण्याच आलेली नाही. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच सर्वात जास्त जागा लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाला देखील अपेक्षीत असं यश मिळालं नाही. काँग्रेसला फक्त 16 जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच बिघाडी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. याचा देखील मोठा फटका महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना बसला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली. तसचे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या विरोधात देखील काम केलं आहे. त्यामुळं अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
महत्वाच्या बातम्या: