CM Eknath Shinde Full PC :आरोप करायला एवढा उशीर का? तुम्ही तिजोरी साफ केली;आम्हाला नालेसफाई करू द्या
नालेसफाईच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद..पाच नाल्यांची पाहणी केली - वडाळा, चुनाभट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसर.
गाळ काढण्यासाठी 54,225 वाहनांचा वापर
हिंदमाता, मिलन सबवे, अंधेरी सबवे मधे 482 पंप्स लावण्यात आले, जे पूर्णतः काम करतायत
भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था
सेंट झेविअर्स मैदानाजवळील टाक्यांची पाहणी केली, तशा टाक्यांचा फायदा झाला
लँडस्लाईड प्रोन एरियाची पाहणी केली..परवा झालेल्या बैठकीत स्पॉट आयडेन्टिफाय केले आणि तिथल्या लोकांना पावसाळ्यापुरतं एमएमआरडीच्या घरात तात्पुरती सोय करायची
लँडस्लाईड प्रोन एरियामधे सेफ्टीनेट लावयाची जेणे करून दगड, बोल्डर कोसळणार नाही
लँडस्लाईड प्रोन भागातील लोकांनी यासाठी सहकार्य करावं
नाल्याच्या रूंदीकरणासाठी ज्याठिकाणी पाणी साचतं अशाठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना दुसरीकडे जावं अशी विनंती आहे
त्यासाठी त्यांना आर्थिक कम्पेन्सेशन किंवा तत्सम काही देण्यात येईल..त्यांच्यावर अन्याय होणार नाही
जोवर हार्ड बेस लागत नाही तोवर नाल्यातील गाळ काढत राहा...केवळ काही मोजमाप करायची नाही