Chiplun Flood : चिपळूणमध्ये हाहाकार; रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे आदेश
कोकणात गेले ४ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळालंय. पावसानं धारण गेलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडून संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनलेय. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरा घुसलंय. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलंय. चिपळूण साठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी खासदार विनाय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणं शक्य नसल्यानं कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 2005 नंतर असा पाऊस कोकणात कधीच पाहिला नव्हता असंही खासदार विनायक राऊत यांनी बोलून दाखवलं.