Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Delhi : दिल्लीत लष्कराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Delhi : दिल्लीत लष्कराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी
हे ही वाचा..
Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free: विक्की कौशल (Vicky Kaushal) अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित'छावा' चित्रपटानं (Chhaava Movie) फक्त राज्यात किंवा देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरलेल्या 'छावा' चित्रपटानं विक्रमांचे अनेक डोंगर उभे केले आहेत. महाराष्ट्रात तर प्रेक्षकांनी 'छावा' चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. अशातच आता महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री (Chhaava Movie Tax Free) करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. तसेच, 'छावा'च्या निर्मात्यांचं अभिनंदनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
'छावा' चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासानं त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल 'देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था', असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या विक्की कौशल यांचं मानापासून अभिनंदन करतो."





















