Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 10 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 10 ऑगस्ट 2026 मंगळवार, 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस गणरायांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विवाहोत्सुक तरुणांची लग्न ठरतील, कलाकार लोकांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्त शक्ती खर्च करावी लागेल, महिला घरात जास्त रमतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड गतिशील परंतु थोडे स्वकेंद्रीत असे तुमचे व्यक्तिमत्व राहील, जरा जास्त संघर्ष करावा लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आस्थापटपणा थोडा वाढेल, दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादा निर्णय घेताना प्रचंड धाडस दाखवाल, दुसऱ्यावर कुरघोडी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःच्या मतांबरोबर इतरांच्या मताचाही विचार करावा लागेल, मानसिक अस्थिरता आणि चंचलतेमुळे कामाची गती मंदावेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये काही बदल करण्याचा विचार कराल, महिलांनी आपले निर्णय बदलू नयेत
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इट का जवाब पत्थर से देऊन दुसऱ्यांवर राग धराल. परंतु त्यानंतर तुम्हाला त्रास होईल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, ज्यांना खांदे हाताची दुखणे आहे, त्यांनी योग्य वेळी औषधोपचार व्यायाम चालू करावेत.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पूर्वीची कामे अडली होती ती मार्गी लागतील, घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनशांतीसाठी ओंकार आणि प्राणायामचा आधार घ्यावा, पैशाची परिस्थिती सुधारेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जुनी येणी वसूल होतील, हातात पैसा आल्यामुळे बरीच देणेही देऊन टाकाल.
हेही वाचा :
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















