एक्स्प्लोर

कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीने विक्रीसाठी ह्या तलवारी आणल्या होत्या. मात्र, पोलिस आरोपीच्या इतर उद्देशांची देखील तपासणी करत आहेत.

जालना : शहरांमध्ये पोलिसांनी तब्बल 41 तलवारीचा शस्त्रसाठा जप्त केलाय, शहरातील (Jalna) सुंदरनगर भागातील आरोपीच्या घरातून पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या असून याप्रकरणी शेख माजेद शेख लतिफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे, राजस्थानातील अजमेरमधून आरोपीने कुरिअरने या तलवारी मागवल्याचं पोलिसांच्या (Police) तपासात निष्पन्न झालं.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीने विक्रीसाठी ह्या तलवारी आणल्या होत्या. मात्र, पोलिस आरोपीच्या इतर उद्देशांची देखील तपासणी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खून आणि लुटमारीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यापूर्वी देखील जालन्यामध्ये तलवारींच्या असाच साठा आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी चंदन जीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना शहरात होत असलेले गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सहा संधू यांनी जालना शहरातील अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांचे विरुद्ध कडक व धोरणात्मक कारवाई करणे संबंधी सूचना केलेल्या आहेत. त्यावरून शहरातील गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या इसमांचे हालचालीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यादरम्यान पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी विरुद्ध कारवाईचा धडाका उडवून अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेली विविध प्रकारची तब्बल 41 घातक हत्यारे चंदनझिरा पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे.

खबऱ्यांमार्फत आरोपीची माहिती

बिडवे यांनी चंदनझिरा पोलीस ठाणेच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांना चंदनझिरा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवर असलेल्या व शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना निगराणीखाली ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांनी निगराणीखाली ठेवलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख माजेद शेख लतिफ वय 23 वर्षे, रा. राबिया मशिदच्या मागे, डायमंड हॉलजवळ सुंदरनगर चंदनझिरा हा संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसून आले होते. त्यावरून चंदनझिरा पोलिसांनी खबऱ्यामार्फत त्याचेबाबत सखोल माहिती घेऊन पाळत ठेवली असता शेख माजेद शेख लतिफ हा त्याचे राहते घरामध्ये धारदार तलवारी, खंजीर व चॉपर बाळगून असून, तो जालना शहरामध्ये अवैध गंभीर कृत्य करण्यासाठी तसेच दहशत पसरविण्याचे उद्देशाने लोकांना विक्री करण्याचे बेतात असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी पथकासह सुंदरनगर परिसरातील शेख माजेद शेख लतिफ याचे घरावर छापा मारून झडती घेतली असता त्याचे घरात अवैधपणे व गुन्हेगारी कृत्यासाठी, जन्मानास दहशत निर्माण करण्यासाठी लोकांना विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या 22 धारदार तलवारी, 15 धारदार खंजीर, 4 धारदार चॉपर असे एकूण 41 घातक हत्यारे, ज्यांची किंमत सुमारे 1 लक्ष 34 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला शेख माजेद याचा साथीदार इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख रा. इंदिरा नगर जालना याचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
Bribe Case : चांदीची अंगठी लाच म्हणून घेणं पडलं महाग! कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
चांदीची अंगठी लाच म्हणून घेणं पडलं महाग! कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Advertisement

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Embed widget