एक्स्प्लोर

पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग

Navi Mumbai News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त युथ फॉर भारत पनवेल संघटनेच्या माध्यमातून ‘ युवोत्कर्ष’ युवा संमेलनाचे आयोजन; युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.

नवी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त युवकांमध्ये नेतृत्वगुण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत, पनवेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘युवोत्कर्ष - The Youth Conclave’ हे युवा संमेलन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत विरूपाक्ष मंगल कार्यालय, पनवेल येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती फाउंडेशनचे श्री. वीरेंद्र चंपानेरकर उपस्थित होते. तसेच युथ फॉर भारतचे अध्यक्ष श्री. ओंकार पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पनवेलमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी तरुणांसोबत संवादात्मक मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्रात व्यापार व वाणिज्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे CA. हिमांशू पंड्या, पर्यावरण व निसर्ग क्षेत्रातील श्री. सर्वेश अभ्यंकर, यूट्यूब आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील श्री. जयदीप काणे, पत्रकारिता क्षेत्रातील जय महाराष्ट्र च्या वृत्तनिवेदिका सौ. रिद्धी म्हात्रे तसेच गायन व कला क्षेत्रातील कु. मिथिला माळी सहभागी झाले.

या सर्व मान्यवरांच्या मुलाखती ABP माझाचे वृत्तनिवेदक श्री. दीपक पळसुले यांनी घेतल्या. अत्यंत अनौपचारिक, मुक्त आणि संवादात्मक वातावरणात झालेल्या या मुलाखतींमधून युवकांना विविध क्षेत्रांतील अनुभव, संघर्ष, संधी आणि यशाचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सत्र युवकांसाठी विशेष आकर्षणाचे ठरले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्री. वीरेंद्र चंपानेरकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी वक्तव्यातून त्यांनी युवकांची ऊर्जा, क्षमता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सकारात्मक उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित युवकांना प्रेरणा आणि नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात पनवेलमधील युथ फॉर भारत-पनवेल च्या युवकांनी एकत्र येत ‘भजन जॅमिंग’ सादर केले. भक्तिगीतांच्या सुरांनी आणि उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच भारतीय संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम ठरला.


पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग

कार्यक्रमाची सांगता कलाश्रुती नृत्य अकादमीच्या पनवेल च्या कलाकारांनी ‘वंदे मातरम्’ या गीतावर सादर केलेल्या मनमोहक नृत्याने झाली. देशभक्तीची भावना जागविणाऱ्या या नृत्य सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि संपूर्ण सभागृहात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

या संमेलनाला सुमारे २५० युवकांसह समाजातील जवळपास १००-१५० विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. युवकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांना, कलागुणांना आणि क्षमतांना व्यासपीठ देण्यासोबतच सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी प्रेरित करणारा ‘युवोत्कर्ष’ हा उपक्रम यशस्वी ठरला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Mumbai High Court FDA: आता नुकसानभरपाई द्या, तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; परवाना निलंबनाचा आदेशही करुन टाकला रद्द
आता नुकसानभरपाई द्या, तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; परवाना निलंबनाचा आदेशही करुन टाकला रद्द
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget