एक्स्प्लोर

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष झाला. दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

Jharkhand Student Protest: झारखंडमधील रांची येथे जेपीएससी-जेएसएससी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटपर्यंत मजल मारली. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष झाला. दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि चपलाही फेकल्या.

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या

सकाळी 10 वाजता विद्यार्थी जुन्या विधानसभा भवनाजवळ जमले आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेला घेराव घातला. पोलिसांनी काटेरी तारांचे बॅरिकेड्स उभारले होते. पोलिसांनी पाण्याचे फवारे मारताच, विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढून नाचताना दिसले. काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. सहा स्तरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, सीआयडीने जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. क्यंगटे यांना अटक केली आहे. 21 जुलै रोजी जेपीएससी कार्यालयावर छापा टाकल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. सीआयडी त्यांची सतत चौकशी करत आहे. झारखंडमध्ये पीएससी-एसएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. देवेंद्रनाथ महातो यांच्यासह सहा विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. ते रुग्णवाहिकेतून विधानसभेच्या घेरावात सामील झाले.

विद्यार्थ्यांच्या सुमारे 98 टक्के मागण्या मान्य  

दरम्यान, रविवारी, विद्यार्थी आणि सरकार यांच्यात चर्चेची तिसरी फेरी पार पडली. सरकारने दावा केला की विद्यार्थ्यांच्या सुमारे 98 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारने जेपीएससी-पीटी परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली. तथापि, जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करणे आणि सीबीआय चौकशी करण्यावर कोणताही करार झाला नाही.

आयोगाच्या तीन सदस्यांचा राजीनामा

दरम्यान, जेपीएससीमध्ये एक मोठा प्रशासकीय बदलही झाला आहे. आयोगाचे तीन सदस्य अजिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तिन्ही सदस्यांनी राज्यपालांकडे आपले राजीनामे सादर केले असून, ते स्वीकारण्यात आले आहेत. यापूर्वी, 22 जुलै रोजी जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांगटे यांनीही राजीनामा दिला होता. सध्या, जेपीएससी भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या आरोपांची सीआयडी चौकशी करत आहे. या संदर्भात आयोगाच्या सदस्यांची चौकशी केली जात आहे. डॉ. अजिता भट्टाचार्य यांची 10 ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Miss World 2026 :  डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं

Embed widget